मुंबई,दि.१४: तेलंगणा महापालिका, नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट पेपरवर) घेण्यात आल्या. तेलंगणामध्ये ११६ नगरपालिका आणि सात महानगरपालिकांसाठी ११ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. स्थानिक निवडणुकांच्या निकालाने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने दमदार विजय मिळवला आहे.
तेलंगणातील ११६ नगरपालिका आणि सात महानगरपालिकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. निकालांमुळे काँग्रेस पक्षात उत्साह निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाने जागा जिंकल्या आहेत. ज्यामध्ये बसपा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आतापर्यंत ४४८ नगरपालिका वॉर्डांचे निकाल
जाहीर झाले आहेत आणि एकूण २,९९६ वॉर्डांचे निकाल जाहीर होत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बुधवारी (११ फेब्रुवारी) एकूण ७३.०१ टक्के मतदान झाले. आतापर्यंत एकूण ४४८ नगरपालिका वॉर्डांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेसने २४० जागांवर (वॉर्ड) विजय मिळवला आहे. तर विरोधी बसपाला १४० जागा मिळाले आहेत आणि भाजप ३७ जागांसह मागे आहे.








