अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकास जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२७: अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी अजय शिवाजी राठोड रा. बक्षीहिप्परगे, ता. दक्षिण सोलापूर या आरोपीस अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीन मंजूर केला.

यात हकिकत अशी की, दि.28/6/2025 रोजी श्री. संत गजानन महाराज यांची पालखी मौजे उळे, ता. दक्षिण सोलापुर येथे आली होती. 

फिर्यादी हे पालखीचे दर्शन घेण्या करीता रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास उळे गावात गेले असता उळे गावाच्या बसस्टोप समोर गर्दीत ढकला ढकलीच्या कारणांवरून फिर्यादीच्या ओळखीचे अजय राठोड व त्यांचे सोबत असलेले इतर लोकांनी मिळून मला शिवीगाळी दमदाटी करत असताना तेथे जमलेल्या लोकांनी आमचा वाद मिटवून आम्हाला तेथुन पाठवून दिले. नंतर तेथून मी माझे मोटार सायकल वरून कामावर जात असताना रात्री 10:00 वाजण्याच्या सुमारास हगलुर गावच्या दहीटणे फाटा हगलूर बसस्टॉप समोर आलो असताना माझे मोटार सायकलला एक पांढ-या रंगाची क्रेटा कार आडवी घालून मला आडविले, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

कारमधुन अजय राठोड व त्याच्या साथीदारांनी खाली उतरून फिर्यादीला मारहाण करून त्यांचे कारमध्ये जबरदस्तीने घालुन घेवुन जात असताना फिर्यादीने आरडा ओरडा केला परंतु फिर्यादीला वाचवण्याकरिता कोणी आले नाही. त्यानंतर त्यासर्वानी फिर्यादीला कारमध्ये घालून मारहाण करीत बक्षीहिप्परगा येथे अंधारात एका ठिकाणी घेवुन जावुन फिर्यादीला हातानी लाथा बुक्याने मारहाण करीत असताना त्या ठिकाणी एक लाल रंगाची बुलेटवर अनोळखी तिघेजण व एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर अनोळखी तिघे जण येवुन त्यांनीही फिर्यादीला लाथा बुक्याने मारहाण करू लागले त्यावेळी अजय राठोड यांने त्याचे जवळील मोबाईल मध्ये फिर्यादीला मारहाण करताना व्हीडीओ काढत होता. 

त्यानंतर त्यातील इतर आरोपीने किर्यादीच्या तळ पायावर लाकडाने मारून फिर्यादी जवळ असलेला मोबाईल व खिशातील रोख रक्कम काढून घेऊन फिर्यादीला खाली अजय राठोड व त्यांचे सोबत असलेले कारमधील साथीदार यांनी फिर्यादीच्या अंगावर लघवी करून फिर्यादीला लाथाबुक्याने मारहण करीत शिवीगाळी व दमदाटी करून फिर्यादीला पुन्हा कारमध्ये जबरदस्तीने टाकुन फिर्यादीला तेथुन घेवुन जात असताना फिर्यादी जोरात आरडा ओरडा करु लागल्याने फिर्यादीला त्या लोकांनी चालत्या कारमधून खाली ढकलुन दिले. 

फिर्यादी तिथेच जखमी अवस्थेत रोडच्या कडेला अंधारात पडून राहीला. तेवढ्यात फिर्यादीच्या गावातील दोघे जात असताना फिर्यादीने त्यांना ओरडुन् थांबविले त्यावेळी ते फिर्यादीजवळ आले आणि फिर्यादीला पाहुन म्हणाले की, अरे बसस्टॅापवर फिर्यादीची मोटार सायकल पाहून दोघे फिर्यादीला शोधत होते असे म्हणून फिर्यादीला झालेली जखम पाहुन का आले होते असे विचारले असता त्यांना फिर्यादीने वरील घडला प्रकार सांगीतला. 

नंतर त्यांनी फिर्यादीला त्यांचे मोटार सायकलवर बसवून फिर्यादीला सिव्हील हॉस्टल सोलापुर येथे उपचारास दाखल केले तेथिल डॉक्टरांनी फिर्यादीला अॅडमिट करून घेतले. त्यानंतर फिर्यादीने अजय राठोड व वरील अनोळखी तिघेजण असे वरील सर्वाविरुद्ध पोलीस ठाणेस तक्रार दिली. अशा आशयाची फिर्याद सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.

सदर कामी आरोपी अजय शिवाजी राठोड रा. बक्षीहिप्परगे, ता. दक्षिण सोलापूर यांनी अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत जामीन मिळणे कामी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केलेला होता. यात आरोपी तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपीकडून कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला नाही. तसेच सदर घटनेचे कोणीही प्रत्यक्ष नेत्रसाक्षीदार नाहीत, त्यामुळे सदरच्या घटनेबाबत संशय निर्माण होतो तरी सदर आरोपी अजय शिवाजी राठोड रा. बक्षीहिप्परगे, ता. दक्षिण सोलापूर  याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. 

सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी अजय शिवाजी राठोड रा. बक्षीहिप्परगे, ता. दक्षिण सोलापूर याचा जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here