Nadeem Khan: धुरंधर चित्रपटातील अभिनेता नदीम खानला अटक

0
नदीम खान

मुंबई,दि.२६: धुरंधर चित्रपटातील अभिनेता नदीम खानला (Nadeem Khan) पोलिसांनी अटक केली आहे. “धुरंधर” या चित्रपटात अभिनेता नदीम खानने दरोडेखोर रहमानचा स्वयंपाकी अखलाकची भूमिका साकारली होती. या अभिनेत्यावर त्याच्या घरकाम करणाऱ्या मोलकरणीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. नदीम खानने लग्नाचे आश्वासन देऊन दहा वर्षे तिचे शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. (Actor Nadeem Khan Arrested)

नदीमवर त्याच्या घरात काम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने तब्बल १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नदीम खान हा ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता नदीम खानला त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणने त्याच्यावर गंभीर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर अटक करण्यात आली. मोलकरणीने आरोप केला आहे की, अभिनेताने सुमारे दहा वर्षे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नदीमने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेला आमिष दाखवल्याचा आरोप आहे.

तक्रार दाखल करणारी महिला ४१ वर्षांची आहे. ती अभिनेता नदीम खानच्या घरी घरकाम करायची. तिने तिच्या जबाबात म्हटले आहे की ती २०१५ मध्ये पहिल्यांदा त्याच्याशी संपर्कात आली होती. काही काळानंतर त्यांचे नाते वैयक्तिक बनले. या काळात, अभिनेत्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here