कोण होणार भाजप गटनेता, पालकमंत्री गोरे यांचे मोठे विधान 

0
बिज्जू प्रधाने आणि नरेंद्र काळे

सोलापूर,दि.२५: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजप गटनेत्याची निवड अजून झालेली नाही. महापौर, उपमहापौर आणि भाजप गटनेता निवडी बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोठे विधान केले आहे. गटनेताच आणि सभागृह कोण होणार आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.  

महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड लांबणीवर गेली आहे. महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता या तीनही पदाचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) ठरवतील असे सांगण्यात आले.

सारस्वत मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख आदी उपस्थित होते.

येत्या २८ जानेवारी रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप नगरसेवकांची नोंदणी होणार आहे. तोपर्यंत गटनेता निवडला जाणार नाही हे आज स्पष्ट झाले. या पदासाठी बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) आणि नरेंद्र काळे (Narendra Kale) यांच्या नावाची चर्चा आहे. बिज्जू प्रधाने यांचा शहरात मोठा संपर्क असून कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. कारंबा ते शेळगी तसेच शहर उत्तर मतदारसंघात देखील मोठा संपर्क आहे. त्यामुळे बिज्जू प्रधाने यांचे नाव महापौर पदासाठीही चर्चेत आहे. 

यामुळे प्रधाने यांना उपमहापौर किंवा सभागृह नेता म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. मात्र उपमहापौर पदासाठी प्रधाने हे भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. मात्र काळे यांनी सभागृह नेता पदासाठी इच्छुक नसल्याचे पक्षाला सांगितले असल्याचे कळते. काळे यांचे नावही महापौर पदासाठी चर्चेत आहे. ३१ जानेवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक होण्याची शक्यता असून त्यापूर्वी सभागृह नेता निवडला जाईल.

दरम्यान आज भाजपा नगरसेवकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महानगरपालिकेतील गटनेता व महापौर निवडीबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट केली. ही प्रक्रिया पूर्णपणे नियम व निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसारच राबवली जाईल, असे सांगून एखाद्या नेत्याचा नातेवाईक पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि तो चांगले काम करत असेल, तर त्याचाही विचार केला जाऊ शकतो. मात्र केवळ नातेसंबंधांच्या आधारे थेट उमेदवारी देणे हे भाजपच्या धोरणात बसत नाही. पक्ष कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन त्यांना न्याय देण्याचा भाजपचा प्रयत्न असतो, असे गोरे यांनी सांगितले

     

महापालिकेच्या गटनेता निवडीसाठी भाजपाची बैठक  पार पडली आहे. सध्या भाजपकडे ८७ नगरसेवक असून पक्षाकडे अनेक सक्षम व अनुभवी चेहरे उपलब्ध आहेत. त्यामधून योग्य व्यक्तीची गटनेता म्हणून निवड केली जाईल.निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार व वेळापत्रकानुसारच महापौर निवड होईल. सोलापूरचा नागरिक आणि भाजपचा नगरसेवकच महापौर असेल, हे निश्चित आहे असेही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here