भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचे स्वीकृत सदस्याबाबत मोठं वक्तव्य 

0

सोलापूर,दि.२१: भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर (Rohini Tadwalkar) यांनी स्वीकृत सदस्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचे पद्माकर काळे, दिलीप कोल्हे तसेच नागेश ताकमोगे यांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात येईल अशी अपेक्षा होती. 

महापालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार नाही. भाजपने हा निर्णय घेतला असून पक्षासाठी त्याग केलेल्या आणि शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींनाच संधी मिळणार आहे, असे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले. महापालिकेत भाजपला १०२ पैकी ८७ जागावर यश मिळालं आहे, त्यामुळे जवळपास ९ जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात येणार आहे.

स्वीकृत सदस्य होण्यासाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात ओढा आहे, त्यामध्ये पराभूत उमेदवारांकडून देखील मागणी केली जाते आहे. मात्र, भाजपच अनेक वर्ष काम करतात आणि अनेकजण आतापर्यंत दूर राहिले  आहेत, त्यांनी पक्ष वाढवण्याचे काम केल्याने त्यांचा विचार पक्ष करणार आहे. ज्या कार्यकर्त्यांकडे व्हिजन आहे आणि पक्षासाठी त्याग केला आहे. त्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल, असेही  तडवळकर यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here