भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

0
शरद तुरकर

अकोला,दि.१७: नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. राज्यातील २९ महापालिकेचे निकाल कालच (दि.१६) जाहीर झाले. भाजपाला २३ जास्त महापालिकेत सत्ता मिळाली आहे. महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर अकोल्यात मोठा राजकीय वाद पेटला आहे. इथं भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित नगरसेवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपाच्याच पराभूत उमेदवार गटाकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अकोला महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून भाजपा नगरसेवक शरद तुरकर हे निवडून आले. निकालानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

अकोल्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये चार जागांपैकी तीन जागांवर एमआयएम पक्षाने बाजी मारली. तर इथून भाजपचे शरद तुरकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले. या प्रभागातील भाजपच्या पॅनलमधील उमेदवार नितीन राऊत यांचा पराभव झाला होता. तुरकर यांनी केवळ स्वत:साठी एक मत मागितलं. आपला प्रचार केला नाही, याच रागातून नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांकडून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here