सोलापूर महानगरपालिका भाजपाला बहुमत 

0

सोलापूर,दि.१६: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत गुरुवारी सोलापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदान शांततेत पार पडले. महापालिकेच्या १०२ जागांसाठी एकुण  ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजपाने २६ प्रभागात सर्वच जागांवर उमेदवार उभे केले होते. अनेक प्रभागातील लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे बिज्जू प्रधाने हे प्रभाग क्रमांक ५ ड मधून विजयी झाले आहेत. ५ अ समाधान आवळे, ५ क मंदाकिनी तोडकरी, ५ ब अलका भवर हे विजयी झाले आहेत. 

प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपचे बिज्जू प्रधानेसह भाजपचे पॅनल विजयी झाले आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आनंद चंदनशिवे हे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. पालकमंत्री जयकुमार, आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोरदार हालचाली केल्या होत्या. 

प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे पॅनल विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचे प्रथमेश कोठेंसह पॅनल विजयी झाले आहे.

प्रभाग 10
प्रथमेश कोठे 12,393 लीडने विजयी
उज्वला दासरी-12,498 लीड
दीपिका यलदंडी-10,812 लीड
सतीश शीरसील्ला-4294 लीड

प्रभाग क्रमांक २ मधून किरण देशमुख यांच्यासह पॅनल विजयी झाले आहे. यात मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात आरोपी असलेल्या शालन शिंदेही विजयी झाल्या आहेत. सोलापुरात भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. प्रभाग क्रमांक १२ चे भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here