सोलापुरात मतदान केंद्रावरील अधिकार्‍यानेच केले भाजपला मतदान?

0
सोलापुरात मतदान केंद्रावरील अधिकार्‍यानेच केले भाजपला मतदान?

सोलापूर,दि.१५: सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक १० मधून मोठी खळबळजनक माहिती समोर येत आहे. मतदान केंद्रावरील अधिकार्‍यानेच ईव्हीएम वरील बटन दाबून भाजपाला मतदान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रभागात विजयकुमार अंकम (Vijayakumar Ankam) हे अपक्ष उमेदवार आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांकरिता आज मतदान होत आहे. 

मतदान केंद्रावरील अधिकार्‍यानेच भाजपाला मतदान केल्याचा आरोप विजयकुमार अंकम यांनी केला आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराने अपक्ष उमेदवारासमोरील बटन दाबले जात नसल्याची तक्रार केली. यावेळी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने मशीन तपासणी करताना थेट भाजपच्या उमेदवाराचे बटन दाबल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मात्र मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने आपल्याला मतदाराने सांगितल्यानंतरच आपण भाजपा उमेदवार समोरील बटन दाबले असा दावा केला आहे. प्रभाग क्रमांक १० मधील उर्दू स्कूल केंद्रावरील हा प्रकार आहे. यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला. अपक्ष उमेदवार अंकम आणि मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यात वाद झाला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here