सोलापूर,दि.२८: ग्रामदैवत श्री सिद्धमल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे जन्मस्थान असलेले सोन्नलगी मंदिर म्हणजेच जुने सिद्धेश्वर मंदिरात सोन्नलगी मंदिराची माहिती असलेल्या ग्रेनाईट कोनशिला बसवुन त्याचे अनावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बु, ग्रामदैवत श्री सिद्धमल्लिकार्जुन प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक गणेश चिंचोळी, सिद्धेश्वर मुनाळे, दिलीप पाटील, गिरीश शहाणे, अभिजीत चिडगुंपी, राजाभाऊ मुंडे, प्रभाकर देशमुख,सतीश स्वामीआदी उपस्थित होते.








