सोलापूर,दि.३०: सोलापूर-हैदराबाद रस्त्यालगत असलेल्या हॉटेल रिंकी बार आणि लॉज येथे हॉटेलच्या आड कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती मिळताच सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून दोन जणांना अटक केली.
हॉटेल मालक अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापूरे (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. बनावट ग्राहकास पाठवून सोलापूरे महिलांचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्री करून पंचासमक्ष धाड टाकण्यात आली.
धाडीत सोलापूरे यासह एका महिलेला ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईत बनावट ग्राहकाकडून घेतलेले १५०० रुपये, स्मार्टफोन, निरोधचे पाकीट तसेच महिलांच्या अंगझडतीत मिळालेला मोबाईल जप्त करण्यात आला.हॉटेलच्या खोल्या वेश्याव्यवसायासाठी वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.








