“मेवाभाऊंची खंबीर साथ.. बोगस धंद्यात घालू हात..” अंबादास दानवे यांनी व्हिडीओ केला शेअर 

0
“मेवाभाऊंची खंबीर साथ.. बोगस धंद्यात घालू हात..” अंबादास दानवे यांनी व्हिडीओ केला शेअर

सोलापूर,दि.७: शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर (X वर) व्हिडिओ शेअर करत भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा कशी वोटचोरी करत आहे याबाबत सादरीकरण केले आहे. राहुल गांधी वारंवार आरोप करत आहेत की, भाजपा मतचोरी करूनच सत्तेत आला आहे. गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात मोहिम राबवली आहे. 

देशात वोटचोरीवरून राजकारण सुरू असतानाच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा ‘खतचोरी’चा एपिसोड.. असे म्हणत व्हिडीओ शेअर केले आहेत. मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात मुंबईत विरोधी पक्षांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला होता. दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

अंबादास दानवे यांची पोस्ट

वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा ‘खतचोरी’चा एपिसोड..

मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत २५० रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते सर्रास करत आहेत. सरकारी बॅगला बाजारात साधारण ११५० रुपये एवढा भाव आहे. इथे भाजपच्या रूपाने कुंपणच शेत खात आहे! 

पावसाच्या अस्मानीने लुटलेल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपचे लोक अश्या ‘सुलतानी’ (की मुलतानी )

पद्धतीने लुटत आहेत. ही खतचोरी करणाऱ्या एका एका माणसाचे नाव मला माहिती आहे. हा खत’जिहाद’ करणारा भाजप कार्यकर्त्या नक्की कोण जो धरलं जात असताना कृषी विभागाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांप्रती थोडी जरी आत्मीयता शिल्लक असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे नाव सांगावे! 

मेवाभाऊंची खंबीर साथ..

बोगस धंद्यात घालू हात.. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here