महाराष्ट्रातील ‘या’ नगरपरिषदांमध्ये 2 डिसेंबरला मतदान

0

सोलापूर,दि.5: राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिताही लागू झाली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, याची चौकशी करून मतदार याद्या दुरुस्त केल्यानंतर निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान; तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामुळे आता सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

या नगरपरिषदांमध्ये निवडणूक

1) पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं). 

2) रायगड- अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड- जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन 

3) रत्नागिरी- चिपळूण,  गुहागर, खेड,  राजापूर आणि रत्नागिरी. 

4) सिंधुदूर्ग- मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला. ठाणे- अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर. 

5) अहिल्यानगर- देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, ( पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर. 

6) धुळे- दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, आणि शिरपूर- वरवाडे. 

7) जळगाव जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, , वरणगाव आणि यावल. 

8) नंदूरबार- शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा. नाशिक- भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव बसवंत आणि त्र्यंबक. 

9) कोल्हापूर-  गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव. 

10) पुणे- आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि . 

11) सांगली- आष्टा,  इस्लामपूर, जत, पळूस,  तासगाव आणि विटा. सातारा- कराड, महाबळेश्वर, मलकापूर,  म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई. 

12) सोलापूर– अक्कलकोट, अकलूज,  बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला. 

13) बीड- अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी वैजनाथ. 

14) छत्रपती संभाजीनगर- गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर. 

15) धाराशिव- भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा. 

16) हिंगोली- बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी. जालना- अंबड, भोकरदन आणि परतूर. 

17) लातूर- अहमदपूर, औसा, निलंगा,आणि उदगीर. नांदेड- बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा. 

18) परभणी- गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ. अकोला- अकोट, बाळापूर, बार्शी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा. 

19) अमरावती – अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे,  मोर्शी,  शेंदूरजनाघाट आणि वरुड. 

20) बुलढाणा- बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा. 

21) वाशीम- कारंजा,  मंगरुळपीर, रिसोड आणि वाशीम. 

22) यवतमाळ- आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, नेर- नबाबपूर आणि पांढरकवडा. भंडारा- पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा.

23) चंद्रपूर- बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा. 
 24) गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली. 
 25) गोंदिया- गोंदिया, आणि तिरोडा. 
 26) नागपूर-  बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर- ब्रह्मणी, कामठी, कांद्री-  रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी,कन्हान- पिपरी, मोवाड, वाडी 
 27) वर्धा- आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि वर्धा.

दुबार मतदारांबाबत ‘हा’ निर्णय 

राज्य निवडणूक आयोगाने टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टारचे (**) चिन्ह लावले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याविषयी त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here