“राज आणि उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही…” भाजपा नेते आशिष शेलार 

0
Ashish Shelar On Raj And Uddhav Thackeray

मुंबई,दि.३: Ashish Shelar On Raj And Uddhav Thackeray: भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत शनिवारी (दि.१) शिवसेना (ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राज ठाकरे यांनी काढ रे ते कापड म्हणत मतदार याद्यांचा गठ्ठे दाखवून दिले. राज यांनी दुबार आणि बोगस मतदानाचे पुरावे मांडले. 

दुबार मतदार आल्यावर त्यांना फोडून काढा असेही राज ठाकरे म्हणाले. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. आशिष शेलार यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आणि महाविकास आघाडीवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या ३१ विधानसभा मतदारसंघांमधील मुस्लीम दुबार मतदारांची आकडेवारी जाहीर केली.

राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का?

सत्याचा मोर्चात राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचा उल्लेख करताना म्हणताना कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी या मतदारसंघांचा उल्लेख केल्यावर आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदार तुम्हाला दिसले नाहीत का? असा सवाल शेलार यांनी केला.

शेलार म्हणाले, “गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!”. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत “महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला,” असे त्यांनी म्हटले. तर राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला. 

दुबार मतदार 

पत्रकार परिषदेत शेलार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, “आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केले असून, त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या 16 लाख 84 हजार 256 इतकी असेल.” ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या आहे. यात महाविकास आघाडीचे समर्थक नाहीत. ती आणखी कितीतरी मोठी असू शकते.

शेलार यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे मतदारसंघ दाखवत उदाहरणे दिली.

कर्जत-जामखेड : रोहित पवार — ५,५३२ दुबार मुस्लिम मते

साकोली : नाना पटोले — ४७७ दुबार मुस्लिम मते

वांद्रे पूर्व : वरुण सरदेसाई — १३,३१३ दुबार मुस्लिम आणि ख्रिश्चन मते

मुंब्रा : जितेंद्र आव्हाड — ३०,६०१ दुबार मुस्लिम मते

लातूर शहर : अमित देशमुख — २०,६१३ दुबार मुस्लिम मते

राज आणि उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही… |Ashish Shelar On Raj And Uddhav Thackeray

यावेळी आशिष शेलार यांनी जयंत पाटील, संदीप क्षीरसागर, वरुण सरदेसाई, वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील मुस्लीम दुबार मतदारांची माहिती दिली. “ही नावं तुम्हाला प्रिय आहेत. काँग्रेसला लांगुलचालनाचा रोग लागला आहे. पण राज आणि उद्धव ठाकरेंची बोबडी का वळली आहे? मुस्लीम दुबार मतदाराबद्दल तुमची भूमिका वेगळी आहे. हा वोट जिहाद आहे. राज आणि उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही. विचार वापसी करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here