सोलापूर,दि.१: Satyacha Morcha: मुंबईत आज (दि.१) शिवसेना (ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा 2019 निवडणूक प्रचारावेळी लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपाची पोलखोल केली होती. आजच्या मोर्चात राज ठाकरे यांनी काढ रे ते कापड म्हणत मतदार याद्यांचा गठ्ठे दाखवून दिले. राज यांनी दुबार आणि बोगस मतदानाचे पुरावे मांडले आहेत.
त्यांनी जेव्हा कधी निवडणुका होतील एकतर पहिल्यांदा घऱात जा आणि याद्यावंर काम करा, तसंच ती माणसं मतदानाच्या ठिकाणी पोहोचतील याची खात्री करा असं सांगितलं आहे. दुबार, तिबार मतदान करणारे आले तर तिथेच फोडून काढायचे. आधी त्यांना बडवायचं आणि मग पोलिसांच्य हाती द्यायचं. त्याशिवाय वठणीवर येणार नाहीत असा आदेशही त्यांनी दिला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्रानंतर पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्षांची एकजूट झालीय, मतचोरी करणाऱ्यांना सांगतोय आज फक्त ठिणगी बघताय, तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीत आहे. असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.








