Omicron: मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत आले एक हजारांच्या आसपास प्रवासी : आदित्य ठाकरे

0

मुंबई,दि.29: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (omicron) आढळल्याने अनेक देशात खळबळ माजली आहे. भारतातही सरकारने निर्देश जारी केले आहेत. देशातही ओमिक्रॉम वेरिएंटमुळे धास्ती निर्माण झाली आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलं असताना दक्षिण आफ्रिकेतून गेल्या 19 दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने फैलावत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने चिंता वाढवली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आलेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत”. यासोबतच परदेशातून आलेल्या गेल्या 10 दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कोरोनाच्या नव्या विषाणूसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त

कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here