सोलापूर,दि.२७: Prakash Ambedkar On Manoj Jarange: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबई येथे २९ अॅागस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी Xवर पोस्ट करत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट | Prakash Ambedkar On Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.
तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?