Trimbakeshwar Nashik: त्र्यंबकेश्वर मंदिरातील धक्कादायक प्रकार समोर 

0

नाशिक,दि.१७: Trimbakeshwar Nashik: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रात श्रावण महिना सुरु असल्याने शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. (Trimbakeshwar Nashik News)

प्रसिद्ध मंदिर नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. या मंदिरात श्रावण असल्याने भाविकांची गर्दी पाहिला मिळतेय. नुकताच या मंदिरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परराज्यातील भाविकांनी या मंदिरात गोंधळ घातला असून यामुळे इतर भाविकांना त्रास सहन करावा लागला. 

Trimbakeshwar Nashik

त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांची मुजोरी पाहायला मिळाली. मंदिरात गर्दी झाल्याने दर्शन रांगेचा दरवाजा बंद केला गेला. मात्र यावेळ परराज्यातील भाविकांनी गोंधळ घातलाय. या भाविकांनी बंद दारावर लाथा मारत हुल्लडबाजी केलीय. दरम्यान त्यांना वारंवार समज देऊनही गोंधळ सुरू राहिल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना चांगलाच चोप दिलाय.

सुरवातीला हा झटापटीचा व्हिडीओ व्हायरल करत मंदिराच्या सुरक्षारक्षकांवर भाविकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर प्रशासनाने दरवाजावर लाथा मारतानाचे व्हिडीओ आणि गोंधळ घालतानाचे व्हिडीओ समोर आणल्यानंतर खरा प्रकार समोर आलाय. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here