‘शिंदेचे आमदार युतीत राहून नेहमी विरोध करतात, आता त्यांना जागा…’ भाजपा आमदार विजयकुमार गावीत

0

नंदूरबार,दि.७: भाजपा आमदाराने शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदाराच्या नावावर १२ फ्लॅट, पत्नीच्या नावे ४ बंगले असल्याचा आरोप केला आहे. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपा आमदार विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिंदे गटातील आमदारावर जोरदार टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. 

काय म्हणाले आमदार विजयकुमार गावीत?

विजयकुमार गावित म्हणाले की, माझ्या टार्गेटवर २ जण आहेत. एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरे आमश्या पाडवी. यांना जास्त मस्ती आलीय, ती जिरवायची आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्या नावावर १२ फ्लॅट आहेत, पत्नीच्या नावे ४ बंगले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून आणि राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतले आहेत. शिंदेचे आमदार युतीत राहून नेहमी विरोध करतात. मी आता त्यांना जागा दाखवणार आहे. त्यांना सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांचा ‘चंद्या’ आणि ‘आमश्या’ असा एकेरी उल्लेख करत हे दोघेही “टार्गेट” असल्याचे संकेत आमदार गावीत यांनी दिले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आमदार आमश्या पाडवी यांच्या कुटुंबावर विजयकुमार गावित यांनी गंभीर आरोप केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here