सोलापूर,दि.९: IAS Dr Sachin Ombase सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation) “माय सोलापूर” या मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध तक्रारींवर वेळेवर आणि समाधानकारक कार्यवाही केल्यामुळे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून सरासरी फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रशासनाच्या या कार्यक्षमतेमुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. (Solapur News)
गेल्या काही महिन्यांत “माय सोलापूर” अॅपवरून घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, पथदिवे, आदी विषयांसंबंधी एकूण २४०१ पेक्षा जास्त तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्यापैकी २२५० तक्रारींवर तत्काळ उपाययोजना करण्यात आली. ९५ टक्के तक्रारी वेळेत पूर्ण करण्यात आल्या आहेत. समाधानकारक सेवा मिळाल्यानंतर ७५ टक्के पेक्षा अधिक नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना थेट मोबाईल अॅपवर फाइव्ह स्टार रेटिंग दिली, हे विशेष उल्लेखनीय आहे.

प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा बळकट करण्यासाठी ‘माय सोलापूर’ हे मोबाईल अॅप उपयुक्त ठरले आहे असे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे (Dr Sachin Ombase) यांनी म्हटले आहे. आम्ही प्रत्येक तक्रारीवर संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करतो. नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”या अॅपमधील फीडबॅक प्रणालीमुळे नागरिक तक्रारीनंतर आपला अनुभव थेट रेटिंगद्वारे नोंदवू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांची कार्यक्षमता, जबाबदारी आणि पारदर्शकता यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असेही ते म्हणाले.