Ashadhi Ekadashi 2025 |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक

0

सोलापूर,दि.6: Ashadhi Ekadashi 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक झाले. आज रविवार, आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय महापूजा केली. त्यांच्या समवेत पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा महापूजेस उपस्थित होत्या. पहाटे 2.23 वाजता पूजा संपन्न झाली. 

शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून कैलास दामू उगले (वय 52 वर्षे) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय 48 वर्षे) मु. पो. जातेगांव, ता. नांदगाव जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. दाम्पत्य गेल्या १० ते १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. कैलास यांचे वडील माजी सैनिक आहेत. 

मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी, लोकप्रतिनिधी शासकीय पूजेस उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? | Ashadhi Ekadashi 2025

शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here