Iran Israel War | युद्धबंदीची घोषणेनंतरही इराण आक्रमक, इस्त्रायलवर मिसाईल हल्ला

0
Iran Israel War | युद्धबंदीची घोषणेनंतरही इराण आक्रमक, इस्त्रायलवर मिसाईल हल्ला

सोलापूर,दि.२४: Iran Israel War | युद्धबंदीची घोषणेनंतरही इराण आक्रमक झाला आहे. इस्त्रायलवर मिसाईल हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Iran Israel War Marathi News)

Iran Israel War

इराण आणि इस्त्रायल यांच्यात मागील 12 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही इराणकडून सतत बॉम्बहल्ला केला जात आहे. इस्त्रायलच्या सुरक्षा विभागाने सांगितलं आहे की, इराणने एका तासाच्या आत तीन वेळा मिसाईल हल्ला केला आहे, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

इराणवर अमेरिकेने तीन दिवसांपूर्वी हल्ला चढविला होता. यामुळे भडकलेल्या इराणने अमेरिकेला धडा शिकविण्याची धमकी दिली होती. यानुसार आज मध्यरात्री इराणने कतारमधील अमेरिकेच्या मोठ्या एअरबेसवर हल्ला चढविला. यानंतर लगेचच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायल-इराणमध्ये सीझफायर केल्याची घोषणा केली. परंतू, ती आता त्यांच्याच अंगलट आली आहे. इराणने ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच इस्रायलवरजोरदार मिसाईल हल्ला चढविला आहे. यात सहा इस्रायली नागरिक मारले गेले आहेत. 

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ताज्या हल्ल्याबद्दल बोलताना सांगितलं की, आमचं शक्तिशाली लष्कर अखेरच्या मिनिटापर्यंत इस्त्रायलला त्याच्या हल्ल्याची शिक्षा देईल. ते म्हणाले की, “सर्व इराणी नागरिकांसह मी आपल्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानतो जे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाची सुरक्षा करण्यास तयार असतात, ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूला उत्तर दिलं”. दरम्यान इराणने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा हल्ला केला असल्याने युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here