मुंबई,दि.२३: BJP MLA Sandeep Joshi | भाजपा आमदाराने शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत आहेत. अशातच सत्ताधारी आमदारानेच आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपा आमदार संदीप जोशी (MLA Sandeep Joshi) यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या… | BJP MLA Sandeep Joshi On Minister Sanjay Rathod
भाजपा आमदार संदीप जोशी यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मृद व जलसंधारण खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत.

शासकीय निर्णय जेव्हा स्पष्ट असतात तेव्हा कुठला तरी भ्रष्ट मार्ग काढून अधिकारी स्वतःच्या बदल्या करून घेतात. मृद व जलसंधारण खात्यात पैसे घेऊन आठ अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक करण्यात आली आहे. जलसंधारण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी शंभर टक्के पैशांचा व्यवहार झाला आहे. या गैरकारभाराची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी केली आहे.