सोलापूर,दि.९: India-Pak Marathi News | पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) भारताने बदला घेतला आहे. (Bharat Take Pahalgam Attack Revenge) भारताने पाकिस्तानमध्ये घुसून मिसाईल हल्ले केले आहेत. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर मिसाईल हल्ला केला आहे. भारताने लाहोर, सियालकोट, कराची आणि इस्लामाबाद येथे हल्ला केला आहे. भारताने पंजाब प्रांतात पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) पाडली आहे. (India Pak War Marathi News)
पाकिस्तानचे होणार दोन तुकडे | India-Pak Marathi News
बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले आहेत. तसेच बलुचिस्तानने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बलुचिस्तान येथील बऱ्याच चेकपोस्टवरून पाकिस्तानी सैनिकांनी पलायन केले.
वृत्तानुसार, बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने ताब्यात घेतल्या आहेत. बीएलएने असा दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. पाकिस्तानी सैन्याने शहराच्या अनेक भागांवरील नियंत्रण गमावले आहे. बीएलएने गॅस पाइपलाइन उडवल्याचा दावा केला आहे.

प्रसिद्ध बलुच लेखक मीर यार बलोच यांनी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वतंत्र्य करण्याचा, आझाद करण्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी भारत सरकारला नवी दिल्लीत बलुच दूतावास उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ही घोषणा केली.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण पार्श्वभूमीवर मीर यार यांनी हे विधान केले आहे. 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी ड्रोन, क्षेपणास्त्राच्या सहाय्याने नागरी आणि लष्करी क्षेत्रांना लक्ष्य करून तणाव आणखी वाढला. मात्र, भारताने त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडून प्रत्युत्तर दिले.
बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानसमोर अनेक आघाड्यांवर आव्हान वाढले आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) खैबर-पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे. गेल्या काही दिवसांत टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. यासोबतच भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरही हल्ला केला.
बलुच लेखक मीर यार बलोच यांनी पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळणार असल्याचा दावा केला आहे. दहशतवादी पाकिस्तानचा नाश जवळ येत असल्याने लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आम्ही भारताला दिल्लीत बलुचिस्तानचे अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करत आहोत, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
संयुक्त राष्ट्राकडे केली ही मागणी |BLA
आम्ही बलुचिस्तानच्या लोकशाही स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांची बैठक बोलावण्याचे आवाहन करतो. आम्ही संयुक्त राष्ट्रांना विनंती करतो की त्यांनी बलुचिस्थानवर कब्जा करणाऱ्या पाकिस्थानी सैन्याला बलुचिस्तानचे प्रदेश, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास सांगितले पाहिजे. आणि पाकड्यांनी त्यांची सर्व शस्त्रे आणि मालमत्ता बलुचिस्तानमध्ये सोडण्यास सांगितले आहे. सैन्य, सीमा दल, पोलास, लष्करी गुप्तचर संस्था, आयएसआय आणि नागरी प्रशासनातील सर्व बलूची नसलेल्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बलुचिस्तान सोडावे, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.