मुंबई,दि.१४: निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले (Ranjeet Kasle) यांनी खळबळजनक दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा एन्काउंटर करण्याची अॅाफर होती असा दावा कासले यांनी केला आहे. वाल्मीक कराडच्या एन्काउंटर करण्यासाठी मोठी रक्कम देण्याची अॅाफर होती असा दावा रणजीत कासले (Ranjeet Kasle) यांनी केला आहे.
रणजीत कासले यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. जर चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल.
फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितले.