संतोष देशमुख हत्या प्रकरण; उज्ज्वल निकम पहिल्या सुनावणीला गैरहजर

0

बीड,दि.१२: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केजच्या जलदगती न्यायालयात सुनावणी पार पडली. पहिल्या सुनावणी बुधवारी केज न्यायालयात पार पडली. यावेळी या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर होते असे समजते.

राज्यभर गाजलेल्या मस्साजोग ( ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मकोका अतिजलद न्यायालयात बुधवारी सकाळी झाली. सुरक्षेच्या करणास्तव व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयासमोर ओळख परेडसाठी हजर करण्यात आले.

सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर इतर आरोपी हे प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते. या प्रकरणी सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितल्यानंतर न्यायमूर्तींनी 26 मार्च पर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला म्हणून कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराडच  संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here