सोलापूर,दि.२: करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) यांनी सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. करुणा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबत X वर व फेसबुकवर पोस्ट केली आहे. सीआयडीकडून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. खंडणी घेण्यात अडथळा ठरत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती.
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मागितला जात आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. यावरूनच करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत उद्या (दि.३) धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे, असा दावा करूणा यांनी केला आहे. उद्या सोमवारी धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेतल्याचे अजित पवार जाहीर करतील असे करूणा मुंडे म्हणाल्या.