सोलापूर,दि.९: अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ महाकुंभ मेळ्याचा आहे. 144 वर्षांनंतर येणाऱ्या महाकुंभ मेळाव्याला अनेकांनी हजेरी लावली आहे. देश परदेशातील लाखो लोकांनी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात स्नान केले आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा आहे.
अनेक राजकीय, सामाजिक आणि अभिनेत्यांनी महाकुंभ मेळ्यात स्नान केले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाकुंभ मेळ्याला भेट देऊन स्नान केले होते. आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाकुंभ मेळ्यात स्नान केले. तिने याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ‘आयुष्यात एकदाच येणारा अनुभव’, अशी पोस्ट प्राजक्ताने केली आहे.