Carcrash: विचित्र अपघातात कार दुसऱ्या कारच्या छतावर चढली

0

दि.24: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विचित अपघात (accident) झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे थरारक व्हिडिओ (Accident Videos Viral) पाहिले असतील. हे व्हिडिओ पाहून सगळेच हैराण होतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन गाड्यांचा भयंकर अपघात पाहायला मिळतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण (Shocking Video) झाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हि़डिओ रस्त्यावरील असून गाडीत बसलेल्या या व्यक्तीने तो रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये एका गाडी समोरून येताना दिसते. इतक्यात दुसऱ्या बाजूने वेगात आणखी एक चारचाकी येते आणि दोन्ही गाड्यांची जबरदस्त धडक होते. या अपघातानंतर काही वेळातच इथे आणखी एक अजब दृश्य दिसतं. अपघातानंतर जी गाडी समोर जाऊन आदळते ती विरुद्ध बाजूने येणाऱ्या तिसऱ्या गाडीवर चढते.

अपघाताचा हा विचित्र व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तसंच या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही Protest News च्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ शेअर करत पेजच्या ॲडमिनने कॅप्शन दिलं, शेवटपर्यंत पाहा. आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here