महाराष्ट्रातील या शहरात जीबीएसचे 28 रुग्ण व्हेंटिलेटरवर, पाच जणांचा मृत्यू 

0

पुणे,दि.2: Guillain Barre Syndrome: भारतातील अनेक राज्यांमध्ये HMPV चे रुग्ण आढळून आले. HMPV मुळे अनेकजण चिंतेत असताना आता गुईलेन सिंड्रोमचे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. गुईलेन सिंड्रोम या आजारामुळे पुण्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. आजार दुर्मिळ असला तरीही तो धोकादायक नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 

पुण्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 149 वर पोहोचली आहे. पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. सद्यपरिस्थितीत 28 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. आतापर्यंत 5 रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. तर शहरातल्या विविध परिसरातील 160 पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 8 पाणी नमुने स्तोत्र पिण्यास अयोग्य असल्याची माहिती समोर आली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here