Walmik Karad: वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ 

0

बीड,दि.25: वाल्मीक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत वाढ झाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आणखी आवळला जात आहे. एकीकडे खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणी वाढत असताना आणखी दणका कराडला बसण्याची शक्यता आहे.

कराडची मालमत्ता जप्त करण्यात यावी यासाठी SIT ने अर्ज केला आहे. विशेष न्यायालयात SIT ने कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी अर्ज केला आहे. वाल्मिक कराड हजारो कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोपी त्याच्यावर होत आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागांतील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती एकत्र केली जात आहे.

या सर्वाचा त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, अशी माहिती मिळत आहे. एखाद्या गुन्हेगाराने गुन्ह्यातून मालमत्ता कमवली असेल अशा निकषापर्यंत जेव्हा तपास यंत्रणा येऊन पोहचतात तेव्हा त्या मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज करतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here