राज्यातील या शहरात आढळले गुईलेन सिंड्रोमचे रुग्ण 

0

मुंबई,दि.21: भारतातील अनेक राज्यांमध्ये HMPV चे रुग्ण आढळून आले आहेत. HMPV मुळे अनेकजण चिंतेत असताना आता गुईलेन सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. या नव्या आजाराने डोके वर काढले आहे. पुण्यात गुईलेन सिंड्रोम या आजाराचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी सध्या एनआयव्हीला पाठवण्यात आले आहेत.

गुईलेन सिंड्रोम या आजारामुळे पुण्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. गुईलेन सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळल्यामुळे पुणे महानगरपालिका देखील दक्ष झाली आहे. गुईलेन सिंड्रोम हा न्युरोलॉजिकल डिसऑर्डर असल्यामुळे याबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक नसल्याचे बोलले जात आहे.

आजार दुर्मिळ असला तरीही तो धोकादायक नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. पुणे शहरातील 6 आणि बाकी रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे.  

पुण्याच्या बाहेरिल हे रुग्ण असून उपचारासाठी पुण्यात आले होते. हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे कुठलाही धोका नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होते, त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. 

काय आहेत गुईलेन सिंड्रोमची लक्षणे?

दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार गुईलेन सिंड्रोम हा नसांवर परिणाम करणारा आजार आहे. यामुळे स्थायू कमकुवत होतात.

स्नायू कमकुवत झाल्यामुळे वेदना होतात आणि संवेदना कमी होतात.

चेहरा, डोळा, छाती, शरिरातील, स्नायूंवर हा आजार परिणाम करतो. या आजारामुळे तात्पुरता अर्धांगवायु आणि श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

हाताची बोटं, पाय यामध्ये वेदना, चालताना समस्या येणे, चिडचिड होणे, चेहऱ्यावर कमजोरी ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here