विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून महाविद्यालयाचा प्रोफेसरच चालवत होता रॅकेट

0

पिलीभीत,दि.23 : विद्यार्थिनींना ब्लॅकमेल (blackmail) करून महाविद्यालयातील प्रोफेसर (Professor) सेक्स रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीलीभीतमधून (Pilibhit) मधून विद्यार्थिनीवरील अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका राजकीय महिला महाविद्यालयात सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचं समोर आलं. येथील एक प्रोफेसर कॉलेजमधील तरूणींना फसवून आपल्या रूममध्ये नेत होता आणि नशेचे पदार्थ देऊन त्यांच्यासोबत अश्लील व्यवहार करण्यासोबत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. इतकंच नाही तर तो नंतर या तरूणींना धमकावत बाहेरही इतर लोकांकडे पाठवत होता. हा आरोप एका विद्यार्थिनीने लावला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार ती शिकत असलेल्या एका महाविद्यालयातील तिच्या कॉलेजमधील गणिताचा प्रोफेसर कामरान आलम खां सेक्स रॅकेट चालवतो. तो कॉलेजमधील विद्यार्थिनींना फसवून नशेचे पदार्थ देत होता. प्रोफेसर तरूणींना अश्लील पुस्तके, सेक्ट टॉइज देऊन त्यांच्यासोबत अश्लील व्यवहार करतो.

कामरान आलम खां हा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आपल्या घरात बोलवून त्यांच्यासोबत अश्लील व्यवहार करत तो त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. जर कुणी तक्रार केली तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही तो देत होता. पोलिसांनी प्रोफेसर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊनही पाहणी केली. 

पोलिसांनी सांगितलं की, तरूणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here