अकोला,दि.11: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी स्वबळावर लढणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असे राऊत म्हणाले. कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर पक्ष मजबूत होईल असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे म्हटले आहे.
विधानसभेतील पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी प्रतिक्रीया दिली.