भंडारा,दि.7: खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात शिक्षकाच्या शेजारी असलेली वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. जखमी वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश संग्रामे असे मयत शिक्षकाचे तर नत्थु गायकवाड असे जखमी वृद्धाचे नाव आहे. मयत शिक्षक आणि जखमी वृद्ध दोघेही नातेवाईक आहेत.
साकोला तालुक्यातील सिरेगावटोला येथील मयत शिक्षक सुरेश संग्रामे हे रहिवाशी आहेत. ते नातेवाईक नत्थू गायकवाड यांच्यासह कार्यक्रमाला जात होते. अर्जुनी मोरगाव येथे नातेवाईकांचा एक कार्यक्रम होता. संग्रामे यांचा मोबाईल खिशात होता. नातेवाईकाकडे जात असताना त्यांच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. त्यात संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गायकवाड हे गंभीर जखमी झाले.