ईव्हीएमविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता

0

मुंबई,दि.7: ईव्हीएमविरोधातील (EVM) लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावरून अनेकांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी येथील गावकऱ्यांनी 3 डिसेंबरला बॅलेट पेपवर मतदान घेण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रशासनाकडून विरोध करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह जवळपास 100 ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ईव्हीएमविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे ईव्हीएमविरोधातील लढ्याला धार येणार आहे. पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणारा EVM विरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. 

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, EVM च्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केलाय. 

पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणारा EVM विरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही.परिणामी संपूर्ण राज्यात “मारकडवाडी पॅटर्न” राबवायला सुरुवात होईल,याची मला खात्री आहे.

येत्या रविवारी आदरणीय पवार साहेब मारकडवाडी ला भेट देणार आहेत.राहुल गांधी देखील ईव्हीएम विरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत.

लोकशाहीला मारक ठरणाऱ्या EVM विरोधातील ही ठिणगी देशभर पसरो.. क्रांतीचा एल्गार एल्गार होवो..! 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here