सोलापूर,दि.२२: त्रिपुरा राज्यातील कथित घटनेचे अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटना यांच्याकडुन मोर्चे, आंदोलने, निदर्शने यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष, विविध संघटना यांचेकडुन विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्याबाबत बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने, सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक झालेले आहे.
सोलापूर शहरात देखील विविध राजकीय पक्ष, विविध संघटनांचे वतीने विविध आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, गर्दी होवून सहभागी होणारे लोकांना कोरोना विषाणू संक्रमण होवू शकतो व अनेकांचे जीवास धोका निर्माण होवू शकतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होवू शकतो.
सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता सोलापूर शहरात दि. २२/११/२०२१ रोजीचे ००.०१ ते दि. २३/११/२०२९ रोजीचे २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश लागू केलेले आहेत.
१) सोलापूर शहरात कोणतेही मोर्चे, धरणे, मिरवणुका/ रॅली, निदर्शने यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात येत आहे.
२) पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीत कलम ३७ (३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये दि. १५/११/२०२१ रोजीचे ००.०९ रोजीपासून ते दि. २९/११/२०२९ रोजीचे २४.०० वा. पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेला आहे. सर्वानी सदर आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
३) राजकीय पक्ष, विविध संघटनांनी इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अफवा अगर सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट, सदेश, ऑडीओ/व्हीडीओ क्लीप प्रसारित करु नये.
सदर बाबींचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८, व इतर कायद्यामधील तरतूदीनुसार कायदेशीर / दंडनीय कारवाईस पात्र असुन त्यांचेविरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी असे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.