सोमवारची ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी रद्द, नवी तारीख जाहीर

0

मुंबई,दि.14: सोमवारची ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. तसेच नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबाबत शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. मुस्लीम धर्मीयांसाठी ईद-ए-मिलाद हा महत्त्वाचा सण आहे. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोमवार 16 सप्टेंबर रोजी मिळणारी ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. 

मात्र यंदा 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत. 

ईद-ए-मिलादची सोमवारी शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि बुधवारी ईद-ए-मिलादची सुट्टी मिळणार आहे. 

दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. 18 सप्टेंबर, 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि.16 सप्टेंबर, 2024 करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. 18 सप्टेंबर, 2024 या दिवशी जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि.16 सप्टेंबर, 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश शासनाने काढला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here