अहमदनगर,दि.2: आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये आमचा अपमान होत आहे, तरीही आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे विधान केले आहे. तसेच केंद्रात मला जरी मंत्रीपद दिलं असतं तरी महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला महायुतीमध्ये मध्ये विचारात घेतलं जात नाही , पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही अशी खंत आठवले यांनी आज नगर येथे व्यक्त केली.
एका कार्यक्रमानिमित्ताने आठवले नगर येथे आले असता शासकीय विश्रामगृहावर ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे ,आधी यावेळी उपस्थित होते.
मला जरी केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मंत्रीपदाची…
आठवले म्हणाले की, मला जरी केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मंत्रीपदाची जरी संधी दिली असली तरी दुसरीकडे मात्र आरपीआय पक्षाला महाराष्ट्र मध्ये विचारात घेतले जात नाही, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाही, शासनाचा जो जो काही कार्यक्रम होतो त्यामध्ये आम्हाला बोलवत नाहीत. राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल व तुम्हाला मंत्रिपद दिले जाईल असे सांगितले मात्र दोन वर्षे उलटून गेले तरीही अजून विस्तार झाला नाही, एक प्रकारे हा अपमान आहे.
आम्हाला अपमान पचवण्याची सवय आहे तरी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत व महायुतीमध्येच राहणार असे वक्तव्य आठवले यांनी केले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जवळचा पक्ष म्हणजेच आरपीआय आहे त्यामुळे आम्हाला राज्यांमध्ये विधानसभेच्या 18 ते 20 जागा मिळाल्या पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.