Honey Trap : बड्या उद्योगपतींकडून ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळले

0

अभिनेत्याच्या पत्नीला अटक

मुंबई,दि.21: Honey Trap लावून अनेक व्यावसायिक व उद्योगपतींना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हनी ट्रॅप लावून लाखो रुपये खंडणी गोळा करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिला फॅशन डिझायनरचा (Fashion designer) समावेश आहे. ती नव्वदच्या दशकातील एका बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे. तर दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल फरार झाल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी सपना उर्फ लुबना वजीर (lubna wazir) हिच्याशिवाय दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर लुबना वजीर उर्फ सपनाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिच्याकडे 29 लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली. तर 7 मोबाईल फोन, 2 कार आणि 8 लाखांहून अधिक किमतीचे दागिने सापडले.

हेही वाचा दोन दुचाकीस्वार पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुबना वजीर मुंबईतील जुहू, वांद्रे, लोखंडवाला ते गोव्यापर्यंत किटी पार्ट्या आणि अनेक कार्यक्रम करत असे. या माध्यमातून लोकांशी मैत्री करुन सावजाचा शोध घेतला जात असे. या लोकांच्या मोडस ऑपेरेंडीनुसार त्यांनी शेकडो जणांना चुना लावला आहे. आता पोलीस प्रत्येक पीडितापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्यापारी असा झाला हनी ट्रॅपचा शिकारी

2016 साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याची गोव्यातील एका व्यक्तीशी ओळख झाली, त्यानंतर दोघेही वारंवार बोलू लागले. 2019 मध्ये हा व्यापारी मुंबईतील अंधेरी परिसरात व्यावसायिक कामासाठी आला होता. आरोपीने व्यापाऱ्याची फायानान्सरसोबत मीटिंग असल्याचं सांगून आपल्या दोन मैत्रिणींना एका पंचतारांकित हॉटेलच्या आलिशान खोलीत भेटायला पाठवले. आपण बिझी असून येणं शक्य नसल्याचा खोटा निरोप फायनान्सरच्या नावे दिला.

दोन्ही महिलांनी व्यापाऱ्यासोबत थोडा वेळ गप्पा मारुन खोलीतच जेवणाची ऑर्डर दिली. यानंतर एक महिला बाहेर कोणीतरी भेटायला आल्याचे सांगून खोलीतून निघून गेली तर दुसरी महिला वॉश रूम मध्ये गेली. थोड्या वेळाने बाहेर गेलेल्या महिलेने येऊन दारावरची बेल वाजवली. व्यापाऱ्याने दरवाजा उघडला. त्याच वेळी वॉशरुममध्ये गेलेली महिला बाहेर आली, मात्र तिच्या अंगावर कपडे नव्हते, तर तिने एक ब्लँकेट गुंडाळले होते. व्यापाऱ्याने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून ती रडू लागली.

व्हिडीओने ब्लॅकमेल

दुसऱ्या महिलेने तात्काळ आरोपी आणि तिच्या महिला साथीदाराचा (कथित पीडित) त्याच अवस्थेत व्हिडिओ बनवला आणि त्याच वेळी त्यांचा पुरुष साथीदारही तिथे आला. त्यानंतर त्याने आधी व्यावसायिकाला धमकावले, त्यानंतर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

2019 पासून आतापर्यंत या लोकांनी व्यावसायिकाकडून 3 कोटी 26 लाख रुपये उकळले आहेत. अखेर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली असता या हनी ट्रॅपमागे दोन पुरुष आरोपीही असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुढील तपास सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here