वटवृक्ष देवस्थानच्या सेवा कार्याचा प्रसार अमेरिकेतही करू: स्वामी नलिनानंद गिरी   

0

अक्कलकोट,दि.११: श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्याचा व स्वामी भक्तीचा विस्तार आता सातासमुद्रापलीकडे म्हणजे अमेरिकेतही पोहोचला आहे. स्वामींची निस्सीम भक्ती करणारे अमेरिकेतही अनेक भक्त आहेत. आज अमेरिकेहून येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन अत्यंत धन्य झालो आहे,असे भारताचे अमेरिकेतील धर्मगुरू स्वामी नलिनानंद गिरी यांनी सांगितले.

शनिवारी,येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वामी निलिनानंद गिरीजी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. 

समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्या अध्यात्मिक सेवा कार्याचा मला अत्यंत हेवा वाटत आहे. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आता यापुढे आम्ही अमेरिकेतही करू, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

या संस्कृतीची व भारतीय अध्यात्माची महती जगाला समजण्याकरिता आम्ही अमेरिकेत आनंदालय या आध्यात्मिक केंद्राची निर्मिती केली आहे. या माध्यमातून भारतीय संस्कृती येथील अध्यात्मिक वातावरण आत्मसात करून जीवन कसे समाधानी करून घ्यावे याचे मार्गदर्शन आम्ही अमेरिकेतील नागरिकांना करीत असतो, असेही ते म्हणाले. 

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवराज स्वामी, प्रणव माळवे, शिवशंकर स्वामी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, स्वामीनाथ मुमूडले, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे आदिसह  भाविक भक्त उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here