प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करत मोठा दावा 

0

अकोला,दि.५: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. तर ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. याबाबत दैनिक लोकमतने वृत्त दिले आहे.

आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे महाविकास महाविकास आघाडीच्या नेत्यांवर व मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशातच आंबेडकर यांनी अकोला इथं बोलत असताना जरांगे पाटलांवर निशाणा साधत जरांगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उभं केलं असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. 

आरक्षण बचाव यात्रेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांनीच उभा केलेला माणूस आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही तर त्यांच्यामागे पवारांचाच हात असल्याचं सिद्ध होईल,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही आगामी निवडणुकीत राज्यात १०० ओबीसी आमदार निवडून आणू, अशी घोषणा केली आहे. “मनोज जरांगेंची जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यामुळे राज्यात दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रुपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here