पंतप्रधान हंसीना शेख यांचा राजीनामा देश सोडून भारतात दाखल

0

नवी दिल्ली,दि.5: बांगलादेशात शेख हसीना सरकार पाडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनाने हिंसक रूप धारण केल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता त्या देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी अंतरिम सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे.

बांगलादेशच्या स्थानिक मीडियामध्ये हसीना भारताला रवाना झाल्याचं बोललं जात आहे. हसीना सुरक्षित स्थळी पोहोचल्याचं वृत्तसंस्था एएफपीनं म्हटलं आहे. 

बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय.  मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या ताब्यात गेली आहे. 

बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव आणि हिंसाचार सुरु आहे. देशाातील लोकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे.  20 लाख लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करत असल्याच्या घोषणेनंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिलं.

बांगलादेशी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी त्यांचे निरोपाचे भाषण रेकॉर्ड करायचे होते. मात्र, परिस्थिती अशी निर्माण झाली की, भाषणाच्या तयारीतच त्यांना देश सोडून पळून जावे लागले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here