सोलापूर,दि.19: जयराज नागणसुरे यांनी स्टिंग अॅापरेशन केले असून स्टिंग अॅापरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. सोलापूर नगर भूमापन कार्यालयात अनेक बोगस नोंदी असल्याचा आरोप नागणसुरे यांनी नुकताच केला होता. त्याचे वृत्त ‘सोलापूर वार्ता’ने दिले होते. आता जयराज नागणसुरे यांनी स्टिंग अॅापरेशन करत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. नागणसुरे हे सिटीसर्वे प्रमुख लिपीक सतीश कवडे यांच्याशी बोगस नोंदी संदर्भात माहिती विचारताना व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओत सतीश कवडे म्हणतात अशी अनेक बोगस नोंदी या कार्यालयात आहेत. मी बदली साठी प्रयत्न करत आहेत. 3 कोटीची जमीन 10 लाखेच्या लाचेद्वारे गडप करण्याचा सिटी सर्वे कार्यालयाच्या अधिकारी यांचा प्रताप असल्याचा आरोप जयराज नागणसूरे यांनी केला. याची नागणसुरे यांनी तक्रार देताच 7/12 उतारा 1 दिवसात बदलला.
काय आहे प्रकरण?
जयराज नागणसुरे यांच्यामुळे बोगस नोंद उघडकीस आली आहे. जयराज नागणसुरे यांनी सोलापूर नगर भूमापन कार्यालयात अनेक बोगस नोंदी आहेत असा दावा केला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवार पेठ येथील सिटी सर्वे क्रमांक 9/178, 493.30 चौरस मीटर जागा मुंबई येथील सिद्राम तुकाराम धडके यांची आहे. ही जागा 26/10/2020 पर्यंत त्यांच्याच नावावर होती.
कुठलेही खरेदीखत न होता 25 /11/2020 ला नगरभूमापन अधिकारी कांगने यांनी लिपिक भागानगरे व एक खाजगी इसम यांनी संगनमताने बोगस कागदपत्रे तयार करून रूप्पणा भीमण्णा दूर्लकर यांच्या नावे करण्यात आली. याची शहानिशा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी चौकशी केली असता नगर भूमापन प्रमुख लिपिक सतीश कवडे यांनी असा प्रकार झाल्याची कबुली दिली.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.