Microsoft सर्व्हर डाऊनमुळे जगभरात घबराट, अनेक सेवा बंद

0

मुंबई,दि.19: भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये हवाई सेवा ठप्प झाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील समस्यांमुळे विमान सेवा प्रभावित झाली आहे. अनेक कंपन्यांची विमाने उडू शकत नाहीत. स्पाइसजेट आणि इंडिगोनेही अशाच प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा हवाला दिला आहे. केवळ एअरलाइन्सच नाही तर बँकिंग सेवा, तिकीट बुकिंग आणि स्टॉक एक्सचेंजवरही अनेक देशांमध्ये परिणाम झाला आहे.

सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म CrowdStrike मधील समस्यांमुळे सेवा प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. इंडिगो आणि स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की सर्व्हरच्या समस्येमुळे सेवा ठप्प आहे. विमानतळावरील चेक-इन आणि चेक-आउट यंत्रणा ठप्प झाली आहे. बुकिंग सेवेवरही परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकन विमान कंपन्यांना झाला आहे. अमेरिकेतील अनेक भागांमध्ये आपत्कालीन सेवा 911 वरही परिणाम झाला आहे. त्यामुळे इमर्जन्सी नसलेल्या कॉल सेंटरच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. 

अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आउटलेट आणि एअरलाइन्सच्या सेवांवरही परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने सांगितले की, शुक्रवारी दुपारी देशातील अनेक कंपन्यांच्या सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

टीव्ही चॅनलचे प्रसारण बंद

स्काय न्यूज या प्रमुख ब्रिटीश वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद झाले आहे. स्काय न्यूज वाहिनीचे प्रसारण होत नसल्याचे चॅनलचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड रोड्स यांनी सांगितले. या व्यत्ययाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here