मुंबई,दि.8: पोलीस कॉन्स्टेबल सईद सलीम पिंजारी यांचे कौतुक होत आहे. T-20 विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुरुवारी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर लाखो लोकांची गर्दी झाली होती. सर्वांना विजयी परेड पाहायची होती. यावेळी एका महिलेची प्रकृती खालावली. मोठ्या गर्दीमुळे तिला श्वास घेता येत नव्हता आणि तिची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका जवानाने तिचा जीव वाचवला.
मरीन ड्राईव्हवर जमलेल्या लाखोंच्या गर्दीत मुंबई पोलीस हवालदार सईद सलीम पिंजारी यांनी बेशुद्ध महिलेला खांद्यावर उचलून नेले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हाच तिचा जीव वाचला. सलीमने वेळीच महिलेकडे लक्ष दिले नसते तर काही अनुचित प्रकार घडू शकला असता.
सईद सलीम पिंजारी आणि त्याची सहकारी तरुणीला गर्दीतून मोकळ्या जागी घेऊन गेले. जिथे तिला मोकळा श्वास घेणे शक्य होते. पाणी देऊन आणि चॉकलेट देऊन त्यांची तब्बेत ठीक होईपर्यंत काळजी घेतली. त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
सईद सलीम पिंजारी यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गर्दीतून महिलेची सुटका करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण त्या वेळी लाखोंच्या त्या गर्दीत सलीमने नायकाप्रमाणे कर्तव्य बजावत महिलेला गर्दीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. मुंबई पोलिसांनीही सईद सलीमचे कौतुक केले आहे.