Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांचा देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचा सल्ला

0

मुंबई,दि.5: Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपन अपेक्षित यश न मिळाल्यामुळे फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये ‘मला सरकारमधून मोकळं करा’ अशी मागणी केली आहे. यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडू नये असा सल्ला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ? | Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis

“सध्याच्या स्थितीत जर देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाजूला झाले, तर त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतील. महायुतीची सुरळीत वाटचाल होण्यासाठी फडणवीसांनी सरकारमध्ये राहणे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा मार्ग अजिबातच स्वीकारता कामा नये,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

“मला असं वाटतं की यश-अपयश ही सर्वांची जबाबदारी आहे. कुण्या एकट्यावर ठपका ठेवणे मला योग्य वाटत नाही. निकाल पाहिल्यावर दु:ख होणे, वाईट वाटणे हे देवेंद्र फडणवीसांसाठी स्वाभाविक आहे. महायुतीचं जहाज सध्या वादळामध्ये सापडलं आहे. अशा वेळी जहाजाचे कॅप्टन्स आहेत त्यांनी बाजूला होणे योग्य नाही. सगळ्यांनी एकत्र राहून विधानसभेची निवडणूक एकत्रित लढली पाहिजे,” असे भुजबळ म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here