मुंबई,दि.2: Sanjay Raut On Exit Poll: चॅनेलने किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेले नाही, कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानानंतर विविध एक्झिट पोलने आपला अंदाज वर्तविला आहे.
या अंदाजाननुसार, भाजपप्रणित NDAचं सरकार बनणार आहे. भाजपप्रणित एनडीएला 370 ते 390 जागांचा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवला आहे. तर इंडिया आघाडीला 130 ते 140 जागा मिळण्याचं भाकीत करण्यात आलंय.
हेही वाचा Somnath Bharti On Narendra Modi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत झाले तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून काढण्यात आले आहेत. या पोलवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एक्झिट पोलवरुन आरोप केले आहेत.
काय म्हणाले संजय राऊत? | Sanjay Raut On Exit Poll
कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत…एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड आहेत…या पोलवरून भाजपला 800 ते 900 जागा मिळतील अशी खोचक टीका राऊतांनी केलीय.
चॅनेलने किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेले नाही, कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानमध्ये एकूण 27 जागा आहेत आणि तिथे एका एक्झिट पोल कंपनीने भाजपाला 33 जागा देऊन टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मोदींनी एवढा वेळ ध्यान केलं आहे, इतके कॅमेरे लावले. साधना केली, तपस्या केली त्यामुळे 360, 370 म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानस्त माणसाला 800 ते 900 जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागले असं मी म्हणेन, अशी टीकाही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.