Arvind Kejriwal On Fawad Chaudhry: अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तान नेत्याला सुनावले  

0

नवी दिल्ली,दि.25: Arvind Kejriwal On Fawad Chaudhry: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर आज मतदान होत आहे. जेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकली. त्यावर लगेचच पाकिस्तानचे माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते चौधरी फवाद हुसैन यांनी ती पोस्ट पुन्हा रीपोस्ट केली. आणि त्यावर कमेंट केली. त्याला सीएम केजरीवाल यांनीही लगेच उत्तर दिले. 

वास्तविक, मतदान केल्यानंतर केजरीवाल यांनी लिहिले की, ‘मी आज माझे वडील, पत्नी आणि मुलांसोबत मतदान केले. माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. ती जाऊ शकली नाही. मी हुकूमशाही, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात मतदान केले. तुम्ही पण मतदानाला जावे. ज्याला रिपोस्ट करत फवाद चौधरीने लिहिले, ‘आशा आहे की शांतता आणि सौहार्द द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करेल.’ 

केजरीवाल यांचा पलटवार | Arvind Kejriwal On Fawad Chaudhry

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लगेच प्रत्युत्तर दिले आणि पोस्ट केले, ‘चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील लोक आमचे प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या ट्विटची गरज नाही. सध्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या.

Arvind Kejriwal On Fawad Chaudhry
Arvind Kejriwal

भारतात होणाऱ्या निवडणुका हा आमचा अंतर्गत विषय आहे. भारत दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here