सोलापूर,दि.१८: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने १३ जिल्ह्यांना इशारा दिला आहे.
हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९ नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा MBBS डॉक्टरचा गाईचे शेण खातानाचा VIDEO व्हायरल, डॉक्टर म्हणाले
पुढील तीन दिवस काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने मुंबईसह, सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.