सोलापूर,दि.17: लोकसभा निवडणूक 2024 यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘400 पार’चा नारा देत लोकसभा निवडणुकीत उतरली आहे, पण भाजपाला जर बहुमत मिळाले नाही तर पक्षाचा प्लॅन बी काय असेल, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला. भाजपा बहुमत जमवण्यास सक्षम आहे, असे उत्तर शाह यांनी दिले.
‘अब की बार 400 पार’ असा नारा देत भाजपाने लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला असून, भाजपाला मोठ्या विजयाचा पूर्ण विश्वास वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून पक्षाचे सर्व बडे नेते एनडीएला 400 हून अधिक जागा आणि एकट्या भाजपला 370 जागा मिळतील असा दावा करत आहेत.
हेही वाचा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाबाबत व्यक्त केला मोठा अंदाज
अशा परिस्थितीत भाजपला बहुमताचा आकडा जमवता आला नाही तर पक्षाचा प्लॅन बी काय असेल, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारला असता, त्यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले. अमित शाह यांनी नुकतीच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, ‘भाजपने बहुमताचा आकडा गाठला नाही तर भाजपकडे काही प्लॅन बी आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की प्लॅन ए यशस्वी होण्याची शक्यता 60% पेक्षा कमी असताना प्लॅन बी बनवण्याची गरज आहे. ते म्हणाले की, मला खात्री आहे की पंतप्रधान मोदी प्रचंड बहुमताने सत्तेत येतील.
बहुमताचा गैरवापर?
एनडीएने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर ते राज्यघटनेत बदल करेल, असा आरोप विरोधी पक्षांचे नेते सातत्याने सभांमध्ये करत आहेत. याबाबत अमित शहा यांना विचारले असता ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून आमच्याकडे संविधान बदलण्यासाठी बहुमत होते, मात्र आम्ही तसे केले नाही.
आम आदमी पार्टी
ते पुढे म्हणाले की, बहुमताच्या गैरवापराचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही, इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेस पक्षाने बहुमताचा गैरवापर केला. याशिवाय अमित शाह यांनी दिल्लीतील दारू घोटाळ्यावरून पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आणि निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल जिथे जातील तिथे लोकांना दारू घोटाळ्याची आठवण येईल, अनेकांना मोठी बाटली दिसेल असे सांगितले.